Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 'या' दिवशी येणार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 'या' दिवशी येणार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. 24 आणि 25 सप्टेंबर रोजी अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. यात छत्रपती संभाजीनगरला महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. दोन दिवसीय दौऱ्यात अमित शाह विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांशीही संवाद साधणार असल्याची माहिती मिळत आहे.

यासोबतच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह निवडक नेत्यांची अमित शाहांसोबत बैठक होणार आहेत. विधानसभा निवडणुकींच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली असल्याचे पाहायला मिळत आहे.

अमित शाह मराठवाड्यात पार्टी विस्तार आणि बूथ रचना संदर्भात बैठक घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com