रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद -  अर्थमंत्री

रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद - अर्थमंत्री

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यात रेल्वेसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. रेल्वेला देण्यात येणारा निधी नवीन ट्रॅक टाकण्यासाठी, अर्ध-हाय-स्पीड वंदे भारत गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी, हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या तसेच अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जाईल. असे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले.

तसेच रेल्वेवर आतापर्यंतचा सर्वाधिक खर्च केला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. या आर्थिक वर्षात रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपये खर्च होणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितलं. व रेल्वेमध्ये खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे.

रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद -  अर्थमंत्री
महिलांना अर्थमंत्र्यांनी दिली खुशखबर; महिलांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा

यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार संपूर्ण रेल्वे प्रणालीच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी रेल्वे बजेटमध्ये 20-25 टक्क्यांनी वाढ करण्यावर काम करत आहे. रेल्वेमध्ये 100 नवीन महत्त्वाच्या योजनांची लागू करणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.

रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद -  अर्थमंत्री
Union Budget 2023 : 'या' गोष्टींवर मिळणार भरघोस सूट; जाणून घ्या काय झाले स्वस्त आणि काय झाले महाग?
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com