Sri Lanka Crisis
Sri Lanka CrisisTeam Lokshahi

संसदेसमोर वाळत घातल्या चड्ड्या; लंकेत सरकारचा अनोख्या पद्धतीनं निषेध

दिवाळखोर झालेल्या श्रीलंकेत जनता सरकारविरोधात रस्त्यावर उतरलेली आहे.
Published by :
Sudhir Kakde
Published on

Sri Lanka Economic Crisis : श्रीलंकेत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. आर्थिक दिवाळखोर झालेल्या श्रीलंकेमध्ये लोक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. महागाईने कळस गाठला असून, खाण्यापिण्याच्या वस्तुंसाठी लोक अक्षरश: रांगा लावून उभे आहेत. अशी परिस्थिती असताना देखील सरकारविरोधात सुरु असलेलं आंदोलन जोरात सुरु आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलक सरकारचा (Sri lankan Government) निषेध करत आहेत. आतापर्यंत आंदोलकांनी रस्त्यावर उतरून हातात वेगवेगळे संदश असणारे नामफलक घेऊन आंदोलनं केली. त्यानंतर अनेक भागांत या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागलं.

Sri Lanka Crisis
राजद्रोहाच्या कलमाबाबत काय म्हणतात, विशेष सरकारी वकील

देशात निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी सर्वस्व राजपक्षे परिवार जबाबदार असल्याचा लोकांचा आरोप आहे. त्यामुळे लोक गेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधान गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajpaksa) आणि महिंदा राजपक्षे (Mahinda Rajpaksa) यांच्या विरोधात आंदोलन केलं आहे. त्यातच आंदोलनातील काही फोटो व्हायरल झाले असून, लोकांनी संसदेसमोर चड्या वाळत घालून सरकारचा निशेध केला.

Sri Lanka Crisis
"Ballot Paper वर निवडणुका घ्या, तरच..."; काँग्रेसनं उपस्थित केला नवा मुद्दा

मोठ्या आर्थिक संकटातून जात असलेल्या श्रीलंकेचा एकूण चलनवाढीचा दर मार्चमध्ये 18.7 टक्‍के होता. अन्नधान्याच्या किमती वाढल्यामुळे एप्रिलमध्ये तो दर सुमारे 30 टक्‍क्‍यांवर पोहोचला. श्रीलंकेच्या जनगणना आणि सांख्यिकी कार्यालयाने रविवारी एप्रिल महिन्यासाठी महागाईची आकडेवारी जाहीर केली. यानुसार गेल्या महिन्यात श्रीलंकेचा एकूण चलनवाढ 29.8 टक्के होती.

महिनाभरात झालेली महागाईतील ही मोठी वाढ आहे. मार्चमध्ये महागाईचा दर 18.7 टक्के होता. एप्रिल 2022 मध्ये अन्नधान्य चलनवाढ 46.6 टक्क्यांवर पोहोचली. यावर्षीच्या सुरुवातीला ती 30.21 टक्के होते. याचं कारण म्हणजे रोख रुपयांच्या तुटवड्यामुळे श्रीलंकेला जीवनावश्यक अन्नपदार्थांचा पुरवठाही योग्य प्रकारे करता येत नाहीये. त्यामुळे किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com