उमेश कोल्हे हत्या प्रकरण; गुप्तचर विभागाकडून उद्धव ठाकरेंच्या फोनची चौकशी होणार - शंभुराज देसाई
नुपुर शर्मा प्रकरणावरून कथित हत्या झाल्याने चर्चेत असलेल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणात गुप्तचर विभागाकडून उद्धव ठाकरेंच्या फोनची चौकशी होणार आहे. उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी विधानसभेत रवी राणा यांनी केली. त्यानंतर उमेश कोल्हे हत्या प्रकरणी गुप्तचर विभागाकडून उद्धव ठाकरेंच्या फोनची चौकशी होणार असल्याचे शंभुराज देसाईंनी घोषणा केली आहे. उमेश कोल्हे हत्याकांड हे 33 महिन्याच्या सरकारच्या काळात झालं. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते.
उमेश कोल्हे हिंदू विचारक होते, ते हिंदू विचारांचा प्रचार, प्रसार करत होते. नुपूर शर्मा त्यांनी एक पोस्ट व्हायरल केली, त्याबाबत त्यांना अनेकदा धमक्या आल्या, धमक्यांनंतरही अमरावतीचे सीपी आरती सिंग यांनी कुठल्याही प्रकारे त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. जेव्हा भर चौकात त्यांची हत्या झाली त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाचा तपास काँग्रेस मंत्र्याच्या सांगण्यावरून जबरी चोरी आणि हत्येमध्ये कनवर्ट करण्यात आला. त्यावेळी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि मी स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून विनंती केली, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही केस दाबण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यावेळी एनआयएचे चौकशी लावली, असही रवी राणा म्हणाले. असे रवी राणा म्हणाले.
या हत्येला दाबण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्र्यांना विनंती आहे की, या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या फोनचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रवी राणा यांनी विधानसभेत केली. यासंपूर्ण प्रकरणाचा राज्य गुप्तचर आयुक्तांकडून विस्तृत अहवाल पंधरा दिवसांच्या आत मागवला जाईल, याप्रकरणी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री अहवाल सादर करणार आहे, हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य गुप्तचर विभागाकडून या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मांडलेले मुद्दे टाकून तयार करणार आहे, अशी माहिती आज शंभूराज देसाईंनी सभागृहात दिली आहे.