वर्षावर मुख्यमंत्री शिंदेंची सरवणकरांसोबत 2 तास चर्चा; सरवणकरांना 4 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम
काल रात्री जवळपास 2 तास वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सदा सरवणकर यांच्यात चर्चा झाली. सरवणकर आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम आहेत. फॉर्म मागे घेणार नाहीत असं त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितल्याने पेच वाढला आहे. या बाबत पुन्हा एकदा विचार करा असा मुख्यमंत्री यांचा सल्ला दिलाय. युतीधर्म पाळावा लागेल अशी सरवणकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दिली आठवण. या मोबदल्यात तुम्हाला किंवा मुलीला विधान परिषदेचीही ऑफर दिल्याची माहीती समोर आली आहे. 4 तारखेपर्यंत योग्य तो निर्णय घ्या, उमेदवारी अर्ज मागे घ्या, असा सरवणकर यांना अल्टिमेटम
दरम्यान, दादर माहिम मतदारसंघात मनसेकडून अमित ठाकरे यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.शिवसेनेकडून सदा सरवणकर यांनीही अर्ज दाखल केला आहे मात्र माहीम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी, असं शिवसेना पक्षातून अनेक नेत्यांनी म्हटलं आहे.