Ulhas River: उल्हास नदीला पूर! नदीकाठच्या गावांना देण्यात आला सतर्कतेचा इशारा
मुंबईत सध्या जोरदार पाऊस पडत आहे. सध्या मुंबईमध्ये जोरदार वारे वाहत आहे. यासह सकळ भागांमध्ये पाणी साचण्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कल्याण डोंबिवलीत कल्याण ग्रामीण परिसरत काल पावसाने चागलंच झोडपून काढला आहे.
या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले असून नद्या दुथडी भरून वाहत आहे. मुसळधार आता उल्हास नदीने अलर्ट मोडची पातळी ओलांडली आहे. नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मिनिटा मिनिटाला उल्हास नदीला पूर आला आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यापर्यंत नदीचे आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नका असं आवाहन करण्यात आलं आहे.
उल्हास नदीची पातळी ही 16.10 इतकी आहे तर धोक्याची पातळी ही 16.70 इतकी आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कल्याण नगर मार्गावर रायता पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. कल्याणला येण्यासाठी गोवेली टिटवाळा मार्गे प्रवास करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.