Uddhav Thackeray : "सध्या एक मुन्ना भाई बाळासाहेबांसारखी शाल घेऊन फिरतोय"
पळता भूई थोडी करु...
महाविकास आघाडीने केलेली काम सध्या त्यांना सहन होत नाहीये. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीनं हल्ले केले जात आहेत. मात्र तुम्हाला सांगू इच्छितो की, कायद्याचा दुरुपयोग करुन आमच्या लोकांना त्रास दिला. आता आमच्या लोकांना त्रास देऊ नका अन्यथा पळता भुई थोडी करु असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुन्ना भाईची स्टोरी सांगत राज ठाकरेंवर निशाणा
उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं की "मला एका शिवसैनिकाचा फोन आला अन् म्हणाला साहेब मुन्ना भाई पाहिला का? त्यातल्या मुन्ना भाईला जसे गांधी दिसतात अन् तो गांधींसारखा वागतो. तसा सध्या एकाला बाळासाहेब दिसतात अन् तो बाळासाहेब असल्याचं समजून शाल घेऊन फिरतो." असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना टोला लगावला.
हिंदुत्वाची चिंता कुणीही करण्याची गरज नाही
हिंदुत्वाची चिंता भाजपने करु नये. कारण सध्या राज्यात हिंदुत्वाद्याचं सरकार आहे अन् त्यापेक्षा जास्त शिवसेनेचे मावळे त्या हिंदुत्वादाच्या संरक्षणासाठी मावळे देखील आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्या दाऊद गुणाचं पोरगं आहे म्हणतील...
भाजपमध्ये गेलेल्या लोकांची पाप धुतली जातात. उद्या दाऊद जरी भाजपमध्ये आला तर हे म्हणतील की, तो गुणाचा पुतळा आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात भाजपचं योगदान काय?
भाषणाला सुरुवात करताच उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्यावरुन भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. काही लोकांना वाटतंय की, तेच हिंदुत्वाचे कैवारी आहेत. मग समोर बसलेले कोण? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात भाजपचं योगदाना काय? असा सवाल केला.
उद्धव ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करण्यासाठी तयार राहावं - संजय राऊत
शिवसेना अन् महाराष्ट्र न कधी झुकला, न कधी झुकणार. मुंबईचा बाप शिवसेनाच आहे, ज्याला कुणाला आजमवायचं असेल त्यांनी आजमावून घ्या. माझ्या भाषणानंतर मुख्यमंत्र्यांचं भाषण होणार असून, या भाषणासाठी ते मोठा दारुगोळा घेऊन येणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. अकबरुद्दी ओवैसी आला तर भाजपची पिलावळं जागी झाली, मात्र 2014 पासून हे ओवैसी राज्यात येतात. हिंदुत्व शिवसेनेमुळे धोक्यात आलं म्हणतात, मात्र तिकडे काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांची परिस्थिती चिंताजनक आहे. आजही काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशाचे नेते होतील. सह्याद्रीप्रमाणं ते हिमालयाच्या सोबत उभे राहतील असं संजय राऊत म्हणाले. तसंच 15 जुनला आदित्य ठाकरे अयोध्येला जातील अशी घोषणा देखील आदित्य ठाकरेंनी केली.
आदित्य ठाकरेंचाही भाजपवर घणाघात...
कार्यक्रमाला झालेल्या प्रचंड गर्दीत मला सगळे देव दिसले असं म्हणत आदित्य ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. आदित्य ठाकरे यांनी कोविड काळात राज्यात झालेल्या कामांचा उल्लेख यावेळी केला. कोविड सेंटर निर्माण करणं असेल, राज्यातील लसीकरण, लॉकडाऊन सारखे निर्णय वेळेवर घेतले. मुख्यमंत्र्यांनी घरातील सदस्याप्रमाणं कोविडच्या प्रत्येक लाटेत लोकांशी संवाद साधला. कोविडचा लढा कसा द्यावा हे महाराष्ट्राने देशाला नाही तर जगाला शिकवलं असं आदित्य ठाकरे म्हणाले. एकुणच आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात विकास कामांचा खासकरून उल्लेख केला. यामध्ये मेट्रो, महामार्ग, ट्रान्स हर्बर लेन अशा वेगवेगळ्या कामांचा उल्लेख केला.
सभास्थळी उद्धव ठाकरेंचं आगमन
उद्धव ठाकरे यांनी भगवा टीळा लावत सभास्थळी प्रवेश केलेला आहे. लवकच त्यांच्या भाषणाला सुरुवात होणार आहे.
"संजय राऊतांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य ठाकरे सिमोल्लंघन करणार"
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्वाचा वसा घेऊन काम करत आहेत. तसंच आदित्य ठाकरे हे देखील त्याच पद्धतीनं काम करत आहेत. काही नव हिंदुंना अयोध्या हा राजकारणाचा विषय वाटत असेल, मात्र आमच्यासाठी तसं नाही. आदित्य ठाकरे लवकरच सिमोल्लंघन करतील, ते अयोध्येला जातील आणि त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम संजय राऊत करतील असं एकनाथ शिंदे म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग सुरु असला तरी ईडा पीडा सारख्या गोष्टींना बाळासाहेबांची शिवसेना घाबरत नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले.
गुलाबराव पाटलांची तोफ धडाडली
शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकारणावर नेहमीच्या धाटणीत टीका केली. अडीच वर्षाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री आणि सरकारने केलेल्या कामाला सर्वांनीच पोच पावती दिली. अनेक पुरस्कार मिळाले. तुमचा बाप, तुमचा खापर पंजोबा जरी आला तरी शिवसेना संपणार नाही असं गुलाबराव पाटील म्हणाले.
शिवसेना थांबली नाही, थांबणार नाही अन् बिन बुडाच्या आरोपांना...
शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच भाषण करत विरोधकांवर निशाणा साधला. कार्यक्रमाची गर्दीच विरोधकांना उत्तर देणार असल्याचं ते म्हणाले. तसंच एक चित्र मी पाहिलं त्यामध्ये आई दिसते...ती आई म्हणते मुर्खा तु 12 वाजेपर्यंत झोपतो अन् तुला 5 वाजेच्या भोंग्याचा तुला त्रास होतो...असं म्हणत सुभाष देसाईंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
शिवसेनेच्या बड्या नेत्यांसह राज्यभरातील शिवसैनिक BKCवर दाखल
शिवसेनेची ही सभा म्हणजे एका अर्थानं शक्ती प्रदर्शन असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे मुंबई शिवाय मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह राज्यातल्या कान्याकोपऱ्यातून शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. शिवसेनेचे अनेक खासदार, आमदार आणि फायर ब्रँड नेते सध्या राजधानीत दाखल झालेले आहेत.
Shiv Sena Rally | BKC Mumbai : मुंबईत आज शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या (Shiv Sampark Abhiyan) कार्यक्रमाचं भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी गेल्या महिनाभरापासून शिवसेनेनं जोरदार तयारी केली होती. राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची ही खुल्या मैदानावरील पहिली जाहीर सभा आहे. शिवसेना सत्तेत आल्यापासून शिवसेनेवर झालेले आरोप प्रत्यारोप, केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया आणि विशेषत: हिंदुत्वाच्या मुद्दयावरुन शिवसेनेला (Shiv Sena) कोंडीत पकडण्याचे प्रयत्न भाजपकडून झाले. राणा, सोमय्या आणि नंतर राज ठाकरेंनीही शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या सर्व आरोपांना शिवसेनेकडून आतापर्यंत माध्यमांमधून, सोशल मीडियावरुन उत्तर दिली जात होती. मात्र आज पहिल्यांदाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांना जाहीर सभेतून उत्तर देणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सभेचे सर्व अपडेट्स वाचण्यासाठी पेज रिफ्रेश करा.