उद्धव ठाकरेंच्या बहिणीची राजकारणात एन्ट्री; भाजपावर केली खालच्या भाषेत टीका
Admin

उद्धव ठाकरेंच्या बहिणीची राजकारणात एन्ट्री; भाजपावर केली खालच्या भाषेत टीका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बहिण कीर्ती पाठक यांची राजकारणात एन्ट्री झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बहिण कीर्ती पाठक यांची राजकारणात एन्ट्री झाली आहे. राजकारणात एन्ट्री घेताच त्यांच्या बहिणीने भाजपावर खालच्या भाषेत टीका केली आहे. ही टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे. कीर्ती पाठक या उद्धव ठाकरेंच्या आतेबहिण आणि ठाकरेंच्या चित्रपट सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र चिटणीस आहेत. सांगलीच्या मिरजमध्ये त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या की, 'भुंकण्यासाठी भाजपाकडून श्वान पथकाची नियुक्ती केली असून काही अंतराने त्यातील एक जण भुंकतो. एक कोकणात भुंकतो तर एक मुंबईमध्ये भुंकतो. त्याच रिमोट दिल्लीत आहे. मुळात हे सर्व स्क्रिप्टेड असतं', 'स्वाभीमान हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नसावा. आम्ही त्यांना गद्दार गट हे नाव दिलं आहे, ते त्यांच्या कपाळावर कायम बसलं आहे,' अशी टीका त्यांनी केली आहे.

यासोबतच त्या म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com