उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात? गुलाबराव पाटील म्हणाले...

उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात? गुलाबराव पाटील म्हणाले...

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेनेला धक्कांवर धक्के बसत आहेत. तसेच सध्या खरी शिवसेना कोण’ यावरुन शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंमध्ये वाद सुरु आहे. यावरुन राजकीय वर्तुळात चांगेलच राजकारण तापले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेनेला धक्कांवर धक्के बसत आहेत. तसेच सध्या खरी शिवसेना कोण’ यावरुन शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंमध्ये वाद सुरु आहे. यावरुन राजकीय वर्तुळात चांगेलच राजकारण तापले आहे.

बाळासाहेब ठाकरेंचे सेवक चम्पासिंग थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केला. हा शिवसेनेसाठी धक्काच होता. मात्र आता अजून एक मोठा धक्का म्हणजे गुलाबराव पाटील यांनी केलेले वक्तव्य ते म्हणजे उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरदेखील शिंदे गटात सामील होणार.

धुळ्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चम्पासिंग थापा यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरदेखील शिंदे गटात सहभागी होतील. तसेच “गुलाबराव पाटलांनr ५० खोके घेतले मान्य आहे. पण चम्पासिंग थापाने काय केलं? ज्या थापाने त्याचं संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या चरणी अर्पण केलं होतं, तोदेखील यांना सोडून आला. यांनी आता टीका करायची तरी कशी. थापा गेला, आता मिलिंद नार्वेकर येत आहेत,” त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेंना उधान आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com