दोन ठाकरे एकाच दिवशी रत्नागिरी दौऱ्यावर; काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष?

दोन ठाकरे एकाच दिवशी रत्नागिरी दौऱ्यावर; काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच दिवशी रत्नागिरी दौऱ्यावर
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

निसार शेख, रत्नागिरी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच दिवशी दि.६ मे रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. राजापूर तालुक्यातील बारसू ग्रामस्थांनी सुरू केलेले रिफायनरीविरोधी आंदोलन, त्यामुळे लागू झालेला जमावबंदी आदेश या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. उद्धव ठाकरे बारसू ग्रामस्थांना भेटण्यासाठी येत असल्याने प्रशासनाकडून सुरू असलेल्या चर्चेला खीळ बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेला आठवडाभर बारसू येथे ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे तणावपूर्ण वातावरण आहे. जिल्हा प्रशासनाकडून आठवडाभरात तीन वेळा ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली आहे. रिफायनरीविरोधी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी मुंबईत बैठक घेण्याची तयारी पालकमंत्री उदय सामंत यांनी दाखवली आहे. गेला आठवडाभर बारसू येथे ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे तणावपूर्ण वातावरण आहे. जिल्हा प्रशासनाकडून आठवडाभरात तीन वेळा ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली आहे. रिफायनरीविरोधी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी मुंबईत बैठक घेण्याची तयारी पालकमंत्री उदय सामंत यांनी दाखवली आहे.

रिफायनरीविरोधक आणि प्रशासन यांच्या चर्चेच्या या फेऱ्या होत असतानाच आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ६ मे रोजी बारसू येथे जाण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ग्रामस्थ, प्रकल्पविरोधी संघटनांचे नेते चर्चेऐवजी पुन्हा संघर्ष हाती घेतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच या दौऱ्याबाबत प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे देखील रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत. रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे सायंकाळी त्यांची जाहीर सभा होणार आहे. हा दौरा पंधरा दिवसांपूर्वीच निश्चित झाला आहे. दोन्ही नेत्यांचे दौरे होणार असल्याचे पोलिस यंत्रणेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com