ताज्या बातम्या
Uddhav Thackeray : जर कुठे गद्दारी किंवा बंडखोरी होत असेल तर त्या पक्षाची जबाबदारी आहे, ती त्यांनी थांबवली पाहिजे
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. सांगलीत विशाल पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, जागावाटप झालेलं आहे. तिन्ही पक्षांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व मित्रपक्षांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर केलेलं आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, आता जर कुठे काही गद्दारी किंवा बंडखोरी होत असेल तर त्या त्या पक्षाची जबाबदारी आहे. ती त्यांनी थांबवली पाहिजे. अन्यथा मला नाही वाटत आता बंडखोरी कुठे झाली तर जनता त्यांना काही स्थान देईल. असे उद्धव ठाकरे म्हणाले.