Uddhav Thackeray
Uddhav ThackerayTeam Lokshahi

'कुटुंबाला वाचवण्यासाठी एकत्र आलो नाही तर...' काय म्हणाले उद्धव ठाकरे?

विरोधी पक्षांची आज बंगळुरुत बैठक पार पडली. या बैठकीत देशातील २६ विरोधी पक्ष एकत्र जमले होते.
Published by :
shweta walge
Published on

विरोधी पक्षांची आज बंगळुरुत बैठक पार पडली. या बैठकीत देशातील २६ विरोधी पक्ष एकत्र जमले होते. महाराष्ट्रातून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार या बैठकीला उपस्थित होते. हा देश आमचं कुटुंब आहे, त्याला वाचवण्यासाठी आम्ही आलो असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदे म्हटले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, देशाला वाचवण्यासाठी हा लढा आहे. वेगवेगळ्या विचारांचे पक्ष असलो तरी एकत्र आलो आहोत. वेगवेगळे विचार असणे हीच लोकशाही आहे. आमचे वेगळे विचार असले तरी एक आलो आहोत. त्याला काही कारणं आहेत. काहींना वाटतं की आम्ही आमचा पक्ष, कुटुंब वाचवायला आलो आहोत. हा देश आमच्यासाठी कुटुंब आहे. आम्ही देश वाचवायला आलो आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

ठाकरे यांनी पुढे म्हटले की, आम्ही एका व्यक्तीविरोधात नाही. आम्ही हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात आहोत, त्यांच्या धोरणाविरोधात आहोत. देशातील नागरिकांमध्ये भवितव्याबद्दल चिंता आहे. देशातील लोकांना आम्ही विश्वास देऊ इच्छितो की तुम्ही चिंता करू नका आम्ही आहोत, असेही ठाकरे यांनी म्हटले.

भाजपविरोधात मंगळवारी बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांची बैठक झाली. बैठकीत 26 पक्षांनी मिळून इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स (INDIA) या नावाने युती करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान विरोधी पक्षांच्या आघाडीची पुढील बैठक मुंबईत होणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले. या बैठकीची तारीख पुढील काही दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले.

Uddhav Thackeray
मोदींच्या एनडीएविरोधात विरोधकांकडून 'INDIA'ची घोषणा; काय आहे फुलफॉर्म?
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com