Uddhav Thackeray Aurangabad Sabha : हिंदुत्व भगव्या टोपीत असेल, तर संघ काळी टोपी का घालतो? : उद्धव ठाकरे
हिंदुत्व भगव्या टोपीत असेल, तर संघ काळी टोपी का घालतो? : उद्धव ठाकरे
हिंदुत्व भगव्या टोपीत असेल, तर संघ काळी टोपी का घालतं? भाजपा जर ऐकत नसेल तर संघाने त्यांच्या कानाखाली मारली पाहिजे. म्हणून मी संघावर टीका केली
नामर्दांच हिंदूत्व तुम्ही आम्हाला शिकवू नका. मर्द असाल तर आधी काश्मिरी पंडितांची रक्षा करा. बाळासाहेब नसते तर तुम्ही दिल्ली काबीज केली असती का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी या उपस्थित केला
शस्त्रक्रिया झाल्यानंतर ६ महिन्यांनी मुंबईबाहेर पाऊल टाकलं : उद्धव ठाकरे
शस्त्रक्रिया झाल्यानंतर ६ महिन्यांनी मुंबईबाहेर पाऊल टाकलं. हे पहिलं पाऊल मराठवाड्यात टाकलं. आजचा दिवस म्हणजे शिवसेनेने मराठवाड्यात पहिलं पाऊल टाकल्याचा आहे. एवढ्या वर्षांनीही शिवसेनेची ताकद तेवढीच आहे. उलट वाढत आहे. मैदानात बसायला जागा नाही. तुमच्या रुपाने तुळजाभवानीचं रुप पाहतो आहे
लाटेचा तडाखा जर भाजपला बसला तर पाणी मागायलाही येणार नाही - संजय राऊत
मराठवाड्यात खूप महिन्यांनी अशी विराट सभा , ३७ वर्षांपूर्वी जी शाखा स्थापन झाली त्याचा वर्धापन दिन शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, विराट जनसमुदाय उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी असेल याचा कुणीही विचार केला नसेल, ही गर्दी म्हणजे समुद्राच्या लाटा, या लाटेचा तडाखा जर भाजपला बसला तर पाणी मागायलाही येणार नाही, महाराष्ट्र हा कोणाचा हे सांगणारी हे सभा
तर भाजपाच्या नामर्द लोकांनी काश्मीरमध्ये जावं : संजय राऊत
आक्रोश पाहायचा असेल तर भाजपाच्या नामर्द लोकांनी जम्मू काश्मीरमध्ये जाऊन आक्रोश पाहावा. रोज अतिरेक्यांचे हिंदूंवर भ्याड हल्ले होत आहेत. मागील २ महिन्यात काश्मीरमध्ये २७ काश्मिरी पंडीत, हिंदूंची घरात घुसून हत्या झाली आणि सरकार नामर्दासारखं हातावर हात ठेवून बसलंय
भाजपकडून फक्त शिवसेनेला बदनाम करण्याचं काम केलं : चंद्रकांत खैरे
पाच वर्षे भाजपची सत्ता असताना त्यांनी औरंगाबादसाठी काय केलं? भाजपकडून फक्त शिवसेनेला बदनाम करण्याचं काम केलं जात आहे, अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.
हातातील सत्ता गेल्याने भाजपाची तडफड होतेय - अर्जून डांगळे
हातातील सत्ता गेल्याने भाजपाची तडफड होतेय. अमित शाह आणि उद्धव ठाकरेंमध्ये सत्तावाटपाची बोलणी झाली तेव्हा मी हजर होतो. मात्र, हिंदुत्वात भागिदार नको म्हणून भाजपाने शिवसेनेला फसवलं. यानंतर उद्धव ठाकरे यांनी शरण जाण्यापेक्षा मी लढणं पसंत करेल असं सांगितलं
मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा देणाऱ्या रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या तिघांना घेतले ताब्यात
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विभाजनाच्या विरोधात मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा देणाऱ्या रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम, अतुल कांबळे, गुणरत्न सोनवणे ह्यांना हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे ताब्यात घेतले.
उद्धव ठाकरे आपल्या भाषणात अनेकांचा समाचार घेतील : अर्जून खोतकर
उद्धव ठाकरे आपल्या भाषणात अनेकांचा समाचार घेतील. शिवसेनेच्या ताकदीवर मोठी झालेली भाजपा आपले रंग दाखवत आहे. भाजपाच्या टीनपाट लोकांकडून रोज खोट्यानाट्या आरोपांचं सत्र सुरू आहे.
हनुमान चालिसाच्या वापर राजकरणासाठी करू नका.- अर्जून खोतकर
ज्यांनी हनुमान चालिसा लिहिला त्या तुलसीदासांचे नातेवाईक मिश्रा यांनी हात जोडून हनुमान चालिसाचा वापर राजकारणासाठी करू नये अशी विनंती केली. भाजपा खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहे : अर्जून खोतकर
औरंगाबादेत मुख्यमंत्र्यांची विराट सभा
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी जनसागर लोटला
औरंगाबादेत शिवसैनिकांची तुफान गर्दी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज (8 मे) औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. सभेसाठी शिवसेनेने पूर्ण तयारी केली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी व्यासपीठावरील सर्वांना करोना (corona) चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे . निगेटिव्ह अहवाल आलेल्यांनाच मिळणार व्यासपीठावर संधी मिळणार आहे. या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता असताना दुसरीकडे हॉटेल रामा समोर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले.