Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची बंडखोरांवर कारवाई, 'या' 5 बड्या नेत्यांचे निलंबन

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची बंडखोरांवर कारवाई, 'या' 5 बड्या नेत्यांचे निलंबन

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून पक्षविरोधी कारवायांमुळे पाच बंडखोर नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
Published by :
shweta walge
Published on

थोडक्यात

शिवसेनेकडून पाच बंडखोर नेत्यांना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, ज्यात भिवंडीचे माजी आमदार रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगुल, संजय आवारी आणि प्रसाद ठाकरे यांचा समावेश आहे.

पक्षविरोधी कारवायांमुळे आणि पक्ष प्रमुखांच्या सूचनेनंतरही त्यांनी आपला अर्ज कायम ठेवला, म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

या कारवाईचा निर्णय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे, ज्यामुळे पक्षाच्या एकात्मतेला धक्का न लागावा, असा उद्देश आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून बंडखोर नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवायांमुळे पाच नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यात भिवंडीचे माजी आमदार रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगुल, संजय आवारी, प्रसाद ठाकरे यांचा समावेश आहे. पक्ष प्रमुखांनी सांगितल्यानंतरही आपला अर्ज कायम ठेवल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

या नेत्यांची शिवसेना (उबाटा ) मधून हकालपट्टी

रूपेश कदम, राजू पेडणेकर, मोहित पेडणेकर, भाग्यश्री आभाळे, गोविंद वाघमारे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com