"देशाला हुकूमशाहा नको, लोकशाही पाहीजे", उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
दोनवेळा आम्ही मोदी सरकारच्या भुलथापांना भुललो. मोदींकडून फक्त फसवाफसवी सुरु आहे. मोदींनी आमची दोनवेळा फसगत केली. गेल्या दहा वर्षात योजनांचं फक्त नामांतर झालं. गोपीनाथ मुंडे यांनी आम्हाला भाजपची खरी ओळख करुन दिली, प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंडे यांच्यामुळे भाजपची खरी ओळख आहे. त्यानंतर नेते म्हणून गडकरी आले. मोदींची गॅरेंटी म्हणजे जुमला. समुद्राच्या तळाशी जातात पण मणिपूरला नाही. अब की बार भाजप तडीपार. आमच्या हिंदुत्वात आणि तुमच्या हिंदुत्वात जमिन आसमानाचा फरक आहे, असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केलीय.
आमदार कपिल पाटील यांनी नितिश कुमार यांच्या जेडीयून बाहेर पडल्यावर स्वत:चा पक्ष स्थापन केला. समाजवादी गणराज्य पाटील असं त्यांच्या पक्षाचं नाव आहे. नितिश कुमार एनडीएसोबत गेल्यानं कपिल पाटलांचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आज त्यांनी धारावीच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्याहस्ते पक्षाची स्थापना केली.
ठाकरे जनतेशी संवाद साधताना म्हणाले, देशाला लढवय्यांची गरज आहे, म्हणून हा पक्ष काढलाय, 'माजवादी एका बाजूला आणि समाजवादी इकडे' तुम्हाला काय पाहिजे, असा सवाल ठाकरेंनी यावेळी जनतेला केला. ते पुढे म्हणाले, देशात भाजपविरोधात आघाडी व्हावी अशी माझी इच्छा होती. नितीश कुमार अशोक चव्हाण सोडून जातील, असं वाटलं नव्हतं.
गडकरींनी अनेक चांगली कामे केली, गडकरींचं नाव पहिल्या यादीत नाही. आमचं हिंदुत्व हे गाडगे बाबांचं हिंदुत्व आहे. ज्याला तहान लागली त्याला पाणी द्यायचं. भाजपकडे ८००० कोटी आणि काँग्रसकेड ८०० कोटी आहेत. देशाला कुणी लुटला, हे सर्वांना माहितीय. तरी काँग्रेसवर आरोप करत आहेत. काँग्रेसला जमलं नाही ते भाजपने करुन दाखवलं. निष्ठावंत गडकरींचं नाव नाही, ही कुठली मोदी गॅरंटी, प्रमोद महाजन हेच शिवसेना-भाजप युतीचे खरे शिल्पकार आहेत.
कोट्यावधी लोकांना रोजगार दिला असं सांगतात मग रोजगार कुठे आहे. ईव्हीएम घोटाळा करुनच दाखवा तुम्ही...माझ्या जाहीर सभेत सर्व शेतकरी असतात. प्रत्येक घटकात सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. विविध योजनांच्या नावाखाली जनतेची फसवणूक सुरु आहे. भाजपच्या विरोधात जिथं तिथं आक्रोश सुरु आहे. आम्ही एकत्र येत आहोत ते हुकुमशाही विरोधात आहोत. आम्हाला लोकशाही या देशात टिकवायची आहे. भाजपकडे पर्याय कोण आहे त्यांना विचारा. शासकीय यंत्रणा भाजपच्या दाराशी झाडू मारतय. भाजपाचा कारभार नाही, केवळ भार आहे.