उदयनराजे तुतारी चिन्हावर निवडणूक लढणार? काय म्हणाले पाहा
साताऱ्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आज भाजपचा स्थापना दिवस खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी भाजप पक्षाचा ध्वज खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते फडकवण्यात आला या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उदयनराजेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलीये.
काय म्हणाले उदयनराजे?
भाजपाचा एक काळ असा होता की भाजपाचे दोनच खासदार होते. मात्र आता देशातला सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाची ओळख झालीये कोणताही भेदभाव इथं केला जात नाही. या पक्षात वशिल्याची गरज लागत नाही सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम या पक्षात केलं जातं यामुळंच पक्षावर विश्वास लोकांच्या मनात निर्माण झालाय बाकीच्या पक्षांची आयडीयालाॅजी चुकिची आहे असं मी म्हणनार नाही. मात्र त्या पक्षांनी सर्वसामान्यांना न्याय या पक्षात दिला गेला असता तर ते पक्ष सुद्धा मोठे झाले असते.
शरद पवार यांच्या सोबत बोलणं झालय का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच नाव अनेक पक्षांनी घेतलय मात्र त्यांचे विचार भाजपानं आचरणात आनले आणि तुतारी म्हणजे काय? हे चिन्ह कोणीतरी घेतलय पूर्वीपासून कोणत्याही लग्नात गेलो तरी तुतारी असतेच आमच्या वाड्यात सुद्धा तुतारी असायची चिन्ह चांगल आहे हे खरं असलं तरी मला दुस-या पक्षावर भाष्य करायचं नाही पक्ष वाढवण्यासाठी त्या पक्षांतील श्रेष्ठींनी त्यांचे प्रयत्न करावेत.
तिकीट कधी मिळणार हा प्रश्न विचारले असता ते म्हणाले की, पत्रकारांचा सारखा तिकीटाचा विषय कायम असतो. कसलं मला पत्रकारांवरच शंका येतीये माझं कुरीअर पॅक करुन लांब पाठवण्याच सुरु आहे. मात्र मी तेवढा सोप्पा नाहीये. सातारा या जिल्ह्यात अनेक चळवळी निर्माण झाल्या जिल्ह्यानं महाराष्ट्राला देशाला दिशा देण्याचं काम केलय सातारावर बोट ठेवलं की बाकीच्या तडजोडी होत राहतात म्हणुन साता-याची आगळी वेगळी ओळख आहे