ताज्या बातम्या
Sandeep Deshpande Attack : संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी दोघेजण ताब्यात
मनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
मनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. मॉर्निंग वॉक करत असताना अज्ञाताने हा हल्ला केला. चार अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. क्रिकेट खेळताना जे स्टम्प्स वापरतात त्याद्वारे देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या चारही इसमांनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता. हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या.
याच पार्श्वभूमीवर आता संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी दोघाजणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मारहाण करणाऱ्या दोन जणांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
मारेकरी भाडुंप पश्चिम मधील रहिवाशी असल्याचे समजते. इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.