Raj Thackeray: विधानसभेसाठी विदर्भातील आणखी दोन उमेदवार घोषित; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली घोषणा

Raj Thackeray: विधानसभेसाठी विदर्भातील आणखी दोन उमेदवार घोषित; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली घोषणा

मनसेकडुन विदर्भातील दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

मनसेकडुन विदर्भातील दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मराठावाडा दौरा केल्यानंतर राज ठाकरेंचा विदर्भ दौरा सुरू असून आज ते गडचिरोली जिल्ह्यात आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवारांची घोषणा केली. मनसेने विधानसभेसाठी आणखी दोन उमेदवार घोषीत केले आहेत.

चंद्रपूर विधानसभेसाठी मनदीप रोडे आणि राजुरा विधानसभा मतदारसंघातून सचिन भोयर यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकांत आघाडी घेत मनसेचे 6 उमेदवारी जाहीर केल्यामुळे त्यांनी एकला चलो रेची भूमिका घेतल्याचेही स्पष्ट होत आहे.

राज ठाकरेंनी घोषित केलेले मनसेचे 6 उमेदवार

1. बाळा नांदगावकर - शिवडी, मुंबई

2. दिलीप धोत्रे - पंढरपूर

3. लातूर ग्रामीण - संतोष नागरगोजे

4. हिंगोली विधानसभा - बंडू कुटे

5. चंद्रपूर - मनदीप रोडे

6. राजुरा - सचिन भोयर

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com