दोन लाख महिलांना 'वे टू कॉझ रायडर्स क्लब इंडिया'तर्फे विनामूल्य सॅनिटरी पॅडचे वाटप
कल्याण : भारतातील विविध भागातील १६० हून अधिक गावांतील २ लाख महिलांना व मुलींना विनामूल्य सॅनिटरी पॅडचे वाटप 'वे टू कॉझ रायडर्स क्लब इंडिया' (way to cause riders club INDIA) तर्फे करण्यात आले. कल्याण डम्पिंग ग्राउंड येथील २८ मे रोजी महिलांना कॉटन सॅनिटरी पॅड्सचे वाटप करण्यात आले. सॅनिटरी पॅड्स वापरावेत की वापरू नये? यास कोणते पर्याय उपलब्ध आहेत? सॅनिटरी पॅड्समुळे महिलांच्या आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होऊ शकतात? कल्याण येतील डम्पिंग ग्राउंड च्या महिलांना, वे टू कॉझ रायडर्स क्लबचे अध्यक्ष रोहित आचरेकर आणि रानडे यांनी सॅनिटरी पॅड्स यांचे रासायनिक विश्लेषण व त्याचा महिलांच्या आरोग्यावर होणारा परिणाम याविषयी सखोल माहिती दिली.
रोहित आचरेकर म्हणाले की, पॅड्स मध्ये जवळपास ९० टक्के प्लास्टिक असतं. शोधलेखानुसार ही रसायनं स्त्रीची त्वचा व जननेंद्रीयाच्या संपर्कात राहिल्यामुळे शरीरात शोषून घेतली जाऊ शकतात. त्यामुळे संपर्क भागाला पुरळ येणं, इन्फेकशन होणं आणि त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वाढते. यामुळे काही महिलांमध्ये क्रॉनिक विकारसुद्धा होऊ शकतात.
सॅनिटरी पॅड्समुळे पर्यावरणावर होणारे परिणाम यावरही बरेचसे शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. म्हणून आम्ही कॉटन सॅनिटरी पॅड्स वाटत आहोत, असे त्यांनी रोहित आचरेकर यांनी सांगितले.
आपले आजी, पणजी यांच्या काळात पण सॅनिटरी पॅड्स नव्हते ठेव असे काही आजार व निसर्गाला होणारा धोका नव्हता. तसेच, कॉटन सॅनिटरी पॅड्समध्ये सेंद्रिय कापसापासून बनवलेले कापड वापरले जातात. हे पॅड्स पुन्हा-पुन्हा वापरण्यायोग्य असतात. ते ३-५ वर्ष चालतात. स्वच्छ धुतल्यानंतर कडक उन्हात वाळवणं गरजेचं असतं. असे सांगून प्रत्येकीला सॅनिटरी पॅड्स कसे वापरायचे व कसे धुवावे याचे प्रशिक्षण रोहित आचरेकर यांनी स्वतः दिले.
रोहित आचरेकर यांनी जर कोणतीही व्यक्ती जर सिगरेट, गुटखा, दारू असेच हानिकारक असूनही खुल्लमखुला होऊ शकतात. तर मग तुम्ही सॅनिटरी पॅड्स पेपरमध्ये का बांधून घेतात, असा सवाल त्यांनी विचारला आहे.