संगमनेर शहरात दोनशे मुस्लिम तरूनांनी शिवसेनेत केला प्रवेश
आदेश वाकळे | संगमनेर : सध्या राज्यातील घडामोडी घडत असताना शिवसेनेची परिस्थिती बिकट झाली आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात शिवसेनेत 200 मुस्लिम तरूणांनी सेनेत जाहीर प्रवेश केल्यामुळे शिवसेना विषयी लोकांच्या मनामध्ये आजही आदरपूर्वक भावना असल्याचे बघायला मिळत आहे.
यावेळी शिवसैनिक मुजिब शेख यांनी सांगितले की, गेल्या 40 वर्षापासून शिवसेना ही हिंदू संघटना आहे. ही अल्पसंख्यांक समाजाची भावना होती अशा प्रकारच्या अफवा पसरल्यामुळे शिवसेनेविषयी लोकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार केले जात आहे. आम्ही गेल्या 30 वर्षापासून शिवसेनेत काम करत असल्यामुळे मला आजही मातोश्रीवर सन्मानपूर्वक वागणूक मिळत आहे. संगमनेर शहरातील मुसलमानांच्या मनात शिवसेनेविषयी आपुलकीची भावना निर्माण झाल्यामुळे संगमनेर शहरातून जवळजवळ 200 जणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करत शिवसेनेविषयी आपुलकी दाखवली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शिवसेना ही भरारी घेईल असे मुजीब शेख यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रामध्ये राजकीय भुकंप झाल्यानंतर शिवसेना पक्षातून अनेक आमदार, खासदार, नेते पक्षातून बाहेर पडले. दरम्यान महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेचा 'दसरा मेळावा' हायजॅक करणार असल्याची माहिती समजत आहे. त्यानुसार हालचालीही शिंदे गटाकडून सुरु झाल्या आहेत. यावरुन शिवसेना व शिंदे गटात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.