Monsoon Session: अधिवेशनाला दोन दिवसांची सुट्टी; कारण काय?
राज्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. सगळीकडे पाणी साचायला लागले आहे. अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदी, नाले भरुन वाहत आहेत. राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या दिल्या जात आहेत. अशा स्थितीत महाराष्ट्राच्या यावेळच्या पावसाळी अधिवेशनाला ४ दिवसांचा सुट्टी आहे.
हा निर्णय काल झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सोमवार आणि मंगळवारी (३१ जुलै आणि १ ऑगस्ट) विधिमंडळाचे सत्र न घेण्याचे सांगण्यात आले आहे. नुकसानाची पाहणी, तेथील पंचनामे करण्यात यावे म्हणून आमदारांनासाठी देखील मतदारसंघात आढावा घेण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकांमध्ये ४ ऑगस्टपर्यंत अधिवेशन सुरू ठेवावे, असे ठरवण्यात आले होते. मात्र, सोमवार-मंगळवारी सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला.