OLX वर विकत होते चोरीच्या गाड्या; दोघांना अटक, 11 गाड्या जप्त

OLX वर विकत होते चोरीच्या गाड्या; दोघांना अटक, 11 गाड्या जप्त

मालकाकडून गाडीचे कागदपत्र मागून घेत या कागदपत्रावरून चोरीच्या गाडीचे कागदपत्र तयार करायचे.
Published by :
Sudhir Kakde
Published on

कल्याण : महात्मा फुले पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरट्यांना अटक केली आहे. मोहम्मद अकबर अब्दुल अजीज शेख व जुनेद अब्दुल अजीज शेख अशी या दोन चोरट्यांची नावं असून, दोघे सख्खे भाऊ आहेत. हे दोघेही ऑनलाईन खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या OLX या साईटवर विक्रीसाठी अपलोड केलेल्या दुचाकी सारखीच दुचाकी चोरी करायचे यांनतर ऑनलाईन गाडी खरेदी करण्यासाठी चौकशी करत संबंधित मालकाकडून गाडीचे कागदपत्र मागून घेत या कागदपत्रावरून चोरीच्या गाडीचे कागदपत्र तयार करायचे.

त्यानंतर चोरीची गाडी OLX वर विकायचेआहेत. या दोघांविरोधात याआधी देखील वाहन चोरीचे 14 गुन्हे दाखल आहेत. या 14 गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून, 11 वाहनं जप्त केली आहेत. यामध्ये 2 बुलेट, 6 दुचाक्या आणि 1 रिक्षा यांचा समावेश आहे. त्यांनी अशा प्रकारे आणखी काही गाड्या विकल्या असाव्यात असा संशय पोलिसांना आहे.

कल्याणचा महात्मा फुले पोलिसांना एक इसम चोरीची बुलेट मोटरसायकल विकण्यासाठी कल्याण पश्चिम बैल बाजार या परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत आरोपी अकबर शेख याला शिताफीने अटक केली आहे. गुन्ह्यात ताब्यात घेतलेली बुलेट चोरीची असल्याचे आणि त्याची OLX वर बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करणार असल्याची माहिती पोलिसाना दिली. या गुन्ह्यात त्याला मदत करणारा त्याचा भाऊ अब्दुल अजीज शेख याला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

OLX वर विकत होते चोरीच्या गाड्या; दोघांना अटक, 11 गाड्या जप्त
गुप्तधनाच्या हव्यासापोटी आजीनेच दिला नातीचा नरबळी; 4 वर्षांनी खुनाचा उलघडा

पोलिसांनी या दोघांकडून कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, शीळ डायघर, मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १४ गुन्ह्यांची उकल करत चोरी केलेली 11 वाहने जप्त केली आहेत यात 2 बुलेट, 6 दुचाक्या आणी 1 रिक्षा यांचा समावेश आहे. दरम्यान आरोपी ऑनलाईन विक्रीसाठी असलेले वाहन कॉपी करून हुबेहूब त्याच गाडीसारखी दिसणारी गाडी चोरी करायचे यांनातर खऱ्या गाडीचे ऑनलाईन पेपर मागून घेत त्या कागदपत्राच्या आधारे बनावट पेपर बनवून त्याआधारे किंमत कमी करून या चोरलेल्या गाड्यांची विक्री olx वर करायची या पद्धतीने हे आरोपी गुन्हे करत असल्याची माहिती एसीपी उमेश माने पाटील यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com