तुर्की-सीरिया भूकंपाने हादरले; तुर्कस्तानमध्ये सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी 7.8 तीव्रतेचा मोठा भूकंप झाला आणि त्यानंतर 40 हून अधिक भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.८ इतकी मोजली गेली. शेकडो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असून अनेक बेपत्ता आहेत.
भारताने तुर्की आणि सीरियातील भूकंपग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी भूकंपामध्ये मृत्यू झालेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरू आहे. तुर्कस्तानमधील काही भागात हवामानात अचानक बदल झाला आहे. भीषण भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जगातील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. तुर्की दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांच्या सांत्वन करणारे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. तुर्कीचे राष्ट्रपती रजब तय्यब एर्दोगान यांनी केलेल्या ट्विटवर पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत तुर्कीच्या लोकांच्या पाठीशी उभा आहे आणि या दुर्घटनेला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.
तुर्कीमध्ये आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे देशाची मोठी हानी झाला आहे. यामुळे सरकारकडून सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.