श्री तुळजाभवानी देवीचे सिंहासन सोन्या-चांदीचे करण्यात येणार
बालाजी सुरवसे, उस्मानाबाद
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ असलेल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे सिंहासन सोन्या चांदीचे करण्यात येणार आहे.तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी देशातील विविध प्रांतामधून दररोज लाखोंच्या संख्येने भाविक तुळजापूरात येत असतात.
तुळजापूरचा विकास आराखडा करण्यासंदर्भात नुकतीच एक अभ्यास समिती गठीत करण्यात आलीय. देवीचे सिंहासन हे सोन्या-चांदीचे करण्यात येणार असुन त्यासाठी विविध प्रांतातील नागरिक तसेच भाविकांनी आपल्या इच्छेनुसार सोने-चांदी व रोख रक्कम दान करण्याचे आवाहन मंदीर संस्थाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी यावेळी केलय.
तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा विकास करत असताना तिरुपती बालाजी,शिर्डी,शेगाव आदींच्या देवस्थानचा अभ्यास दौरा करुनच येत्या तीन महिन्यात तुळजापूरचा विकास आराखडा सादर करण्यात येणार आहे.