पुणे एक्सप्रेस वेवर आज ट्रॅफिक ब्लॉक, जाणून घ्या कसा असेल मार्ग!

पुणे एक्सप्रेस वेवर आज ट्रॅफिक ब्लॉक, जाणून घ्या कसा असेल मार्ग!

पुणे एक्सप्रेस वेवर आज ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई-पुणे महामार्गावर कायम वाहनांच्या रांगा लागेलेल्या असतात. तर त्यासाठी आज ओव्हर हेड गॅन्ट्री बसविण्यासाठी या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पुणे एक्सप्रेस वेवर आज ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई-पुणे महामार्गावर कायम वाहनांच्या रांगा लागेलेल्या असतात. तर त्यासाठी आज ओव्हर हेड गॅन्ट्री बसविण्यासाठी या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

वाहनधारकांची गैससोय होऊ नये म्हणून प्रशासनाकडून पूर्वकल्पना देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या मुंबईहून पुण्याकडे किंवा पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी वेवर किवळे ते सोमाटणे दरम्यान पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.

दुरुस्तीच्या कामासाठी पुणे-मुंबई एक्सप्रेसवरील वेवर किवळे ते सोमाटणे पर्यंतची वाहतूक ही बंद राहणार आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ही जुन्या महामार्गे सोमाटणे येथून ती पुन्हा सोमाटणे ते मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर उर्से टोलनाक्यावर वळविण्यात येणार आहे.या दोन तासामध्ये ओव्हर हेड गॅन्ट्री बसवली जाणार आहे. त्यामुळे वाहतुक सुरळीत होईल असा विश्वास प्रशासनाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com