Kalsubai Peak
Kalsubai Peakteam lokshahi

कळसुबाई शिखरावर अडकलेल्या पर्यटकांची अखेर सुटका

हजारो पर्यटकांची राजुर पोलिसांसह स्थानिक युवकांनी केली सुटका
Published by :
Shubham Tate
Published on

Kalsubai peak : अकोले तालुक्यातील महाराष्ट्राचे ऐवरेस्ट म्हणून परीचित असलेल्या कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या कृष्णावंती नदीला आलेल्या पुरामुळे शिखराच्या पायथ्याशी अडकलेल्या एक हजार पर्यटकांची राजुर पोलिस स्टेशन व जहागिरदार वाडीतील युवकांनी सुखरुप सुटका केली आहे. (Tourists stranded on Kalsubai peak due to floods)

भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व कळसुबाई शिखराच्या परीसरात शनिवारी सकाळपासून अतिवृष्टी होत होती. शिखरावरही प्रचंड पाऊस पडत असल्याने संपुर्ण पाणी पायथ्याशी उगम पावलेल्या कृष्णावंती नदीला येऊन मिळत असल्याने कृष्णावंती नदीला पुर आला होता. शनिवार असल्याने सकाळी पावसाचा अंदाज न आल्याने हजारो पर्यटक शिखराच्या दिशेने गिर्यारोहनासाठी रवाना झाले होते.

Kalsubai Peak
बॉलीवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याचे 'सून'सोबत अफेअर, बलात्काराचा आरोप

सकाळी ९ वाजल्यापासुन मात्र प्रचंड प्रमाणात पाऊस सुरु झाल्याने गिर्यारोहक शिखर खाली उतरुन आले असता नदीच्या पाण्यामुळे बारी व जहागिरवाडी या ठिकाणी पोहचु शकत नव्हते. तेव्हा काही गिर्यारोहकांनी पोलिस हेल्पलाईन क्रमांक ११२ ला फोन करत पुराच्या पाण्यामुळे अडकल्याची माहीती दिली. हा संदेश तातडीने राजुर पोलिस स्टेशनला प्राप्त होताच सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळावर हजर झाले. तोपर्यंत जहागिरदार वाडीतील काही व्यवसायीक, गाईड व गावकरी यांनी दोराच्या सहाय्याने नदीच्या पलिकडे अडकलेल्या गिर्यारोहकांना स्वत: नदीवरील एका केटीवेअरच्या ठिकाणी पाण्यात उभे राहत साखळी करत बाहेर काढण्यास सुरुवात केली होती.

Kalsubai Peak
Free Silai Machine Scheme : मोदी सरकार देतय मोफत शिलाई मशीन, आजच करा अर्ज

संध्याकाळी सात वाजेपर्यंत हे रेस्क्यु ऑपरेशन सुरच होते. संध्याकाळपर्यंत एकहजार गिर्यारोहकांची सुखरुप सुटका करण्यात पोलिस व गावक-यांनी बाजी मारली होती. या रेस्क्यु ऑपरेशन मध्ये राजुर पोलिसांकडून सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलिस कर्मचारी अशोक गाढे, विजय फटांगरे व राकेश मुळाने सामिल झाले होते तर जहागिरदार वाडीतील युवकांची नावे समजु शकली नाहीत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com