Mahabaleshwar: मुसळधार पावसामुळे महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळे बंद

Mahabaleshwar: मुसळधार पावसामुळे महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळे बंद

महाराष्ट्राच्या सर्वच भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहेत.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

महाराष्ट्राच्या सर्वच भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहेत. अनेक जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा वाढता जोर पाहता, पर्यटनस्थळी पर्यटकांनी न येण्याचं, आवाहन प्रशासनाने केलेलं आहे. महाबळेश्वरमध्ये हंगामातील उचांकी 12.99 इंच पावसाची नोंद झाली आहे. आजअखेर 125 इंच पाऊस अर्थातच 3000 मिलिमीटरचा पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार पाऊस सुरू आहे. महाबळेश्वरसह बऱ्याच पॉईंटवर पर्यटकांची गर्दी होत आहे. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी व पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध विभागांचे संयुक्त पथक स्थापन केले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांची गर्दी असणारे महाबळेश्वरमधील सर्वच पर्यटनस्थळे काही दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत काही पर्यटक जीव धोक्यात घालून पावसाळी पर्यटन करत असल्याने त्यांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने उपाययोजनेचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे

Mahabaleshwar: मुसळधार पावसामुळे महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळे बंद
Thane Rain: ठाण्यात पावसाचा जोर वाढला; जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com