Tomato Price Hike : भाजीतला टोमॅटो होणार गायब? भाव झाला एवढे रुपये किलो

Tomato Price Hike : भाजीतला टोमॅटो होणार गायब? भाव झाला एवढे रुपये किलो

महागाई वाढतच चालली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

महागाई वाढतच चालली आहे. महागाईमुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. टोमॅटोचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये एक किलो टोमॅटोचा भाव 120 ते 160 रुपये किलो आहे.

मुंबईत पावकिलो टोमॅटोचा भाव 40 रुपये आहे. अनेक भागात भागात किलोमागे टोमॅटोचा भाव 120 ते 150 रुपये आहे. मार्केटमध्ये टोमॅटो इतक्या महागड्या किंमतीला ग्राहकांना विकत घ्यावा लागतोय.

व्यापारी शेतकऱ्यांकडून 20 ते 30 रुपये किलोने टोमॅटो विकत घेत आहेत. तोच टोमॅटोचा 120 ते 160 रुपये किलोने टोमॅटो विकला जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com