‘ज्ञानवापी’ प्रकरणाचा आज निकाल; वाराणसीत संचारबंदी
ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणी न्यायालयाने 12 सप्टेंबरपर्यंत निकाल राखून ठेवला होता. वाराणसीच्या ज्ञानवापी मशिद संकुलात असलेल्या माँ शृंगार गौरीचे नियमित दर्शन आणि पूजेची मागणी करणारी हिंदू समाजाच्या बाजूने याचिका दाखल केली गेली होती, ती याचिका कायम ठेवण्या योग्य आहे की नाही त्यावरच वाराणसीचे जिल्हा न्यायालय आज 12 सप्टेंबर रोजी निकाल देणार आहे.
ज्ञानवापी मशिदी बाहेरील भिंतीवर असलेल्या हिंदू देवतांच्या दैनंदिन पूजा करण्याचे आदेश देण्यात यावेत या मागणीसाठी दिल्लीतील राखी सिंग आणि वाराणसीतील चार महिलांनी गेल्या वर्षी न्यायालयात याचिका दाखल केली गेली होती. त्यानंतर मात्र दिवाणी न्यायाधीशांच्या आदेशानुसार मे महिन्यामध्ये ज्ञानवापी परिसराचे व्हिडिओग्राफी सर्वेक्षण करण्यात आले होते. ज्ञानवापी सर्वेक्षणाचा अहवाल गेल्या 19 मे रोजी जिल्हा न्यायालयात सादर करण्यात आला होते, त्यानंतर सर्वेक्षणादरम्यान, हिंदू बाजूने ज्ञानवापी मशिदीच्या वाजू खान्यात शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला होता, तर मुस्लिम बाजूने ते कारंजे असल्याचे सांगण्यात आले होते.
आज निकाल असल्यामुळे शहरात आणि शहराबाहेरही प्रचंड मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला गेला आहे. संवेदनशील भागात पोलिसांसकडून पोलीस गस्त घालत असून शहरातील प्रत्येक गल्लीत पोलीस तैनात केले गेले असून कलम 144 लागू केले गेले आहे. तर जिल्ह्यातील संवेदनशील भागातही प्रचंड मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.