Eknath Shinde and Supreme court
Eknath Shinde and Supreme courtTeam Lokshahi

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात आज काय झाले? कधी लागणार सेनेच्या याचिकेवर निर्णय?

Maharashtra Political Crisis : राज्याचा शिंदे सरकार आणि उद्धव ठाकरे गटामध्ये सुरु असलेल्या वादासंदर्भात सर्वांच्या नजरा आज सर्वोच्च न्यायालयाकडे लागल्या होत्या.
Published by :
Team Lokshahi
Published on

Maharashtra Political Crisis : राज्याचा शिंदे सरकार आणि उद्धव ठाकरे गटामध्ये सुरु असलेल्या वादासंदर्भात सर्वांच्या नजरा आज सर्वोच्च न्यायालयाकडे लागल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिंदे सरकार आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे भवितव्य ठरणार होते. आज सर्वोच्च न्यायालयात काय घडले जाणून घ्या आपल्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर...

Eknath Shinde and Supreme court
Dharmaveer : "धर्मवीर" मुक्काम पोस्ट ठाणे... चित्रपटाला दादासाहेब फाळके एक्सलन्स अवॉर्ड

आज सुनावणीस आली नाही याचिका

आमदारांच्या अपात्रतेबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात पुढे आज सुनावणीस आली नाही. यामुळे शिवसेनेच्यावतीने सरन्यायाधीशांकडे या सुनावणीबाबत विनंती करण्यात आली.

शिवसेनेने काय सांगितले

शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी प्रकरण सुप्रीम कोर्टात सांगितले की, उद्या अपात्रतेबाबतचा मुद्दा विधानसभेत ऐकला जाईल. जर कोर्टानं आज सुनावणी घेतली नाही तर विधानसभा अध्यक्ष यावर निर्णय घेऊ शकतात.

Eknath Shinde and Supreme court
Ashadhi Wari 2022 : मुख्यमंत्र्यांच्या चार पिढ्यांनी केली विठू माऊलीची महापूजा

सरन्यायाधीशांनी काय निर्णय दिला

शिवसेनेची याचिका सरन्यायाधीशांकडे आल्यानंतर सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेबाबत कारवाई न करण्याचे निर्देश दिले. तसेच या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी खंडपीठ तयार करावा लागणार असल्याचेही सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी सांगितले.

सरन्यायाधीश म्हणाले, घटनापीठ करावे लागेल

सरन्यायाधीश म्हणाले की, या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी घटनापीठ तयार करावे लागणार आहे. त्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे या सुनावणीस वेळ लागणार आहे.

आता पुढे काय

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे तुर्त शिंदे सरकारला दिलासा मिळाला आहे. आता पुढील सुनावणीबद्दल न्यायालयाने तारीख निश्चित केलेली नाही. यामुळे हे प्रकरण लांबणीवर पडण्याचीच चिन्ह आहेत. सध्या दोन्ही बाजूंच्या आमदारांना दिलासा असला, तरी कारवाईच होणार नाही. यामुळे शिंदे सरकार न्यायालायचा अंतिम निकाल येईपर्यंत सत्तेवर राहणार आहे.

सुप्रीम कोर्टात कोणत्या याचिका?

  • १६ आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नोटिशीला आव्हान

  • एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदी कायम ठेवून चौधरींची नियुक्ती रद्द करण्याला विधान सभा अध्यक्षांच्या निर्णयास आव्हान

  • एकनाथ शिंदे यांना गटनेते आणि गोगावले यांना प्रतोदपदी निवडीला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेनेकडून आव्हान

  • एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला शिवसेनेकडून आव्हान

  • विधानसभा अध्यक्ष निवडीची अनुमती देण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेकडून कोर्टात याचिका

  • विश्वासदर्शक ठरावाचे निर्देश देण्याच्या राज्यपाल कोश्यारी यांच्या आदेशालाही शिवसेनेकडून आव्हान

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com