ताज्या बातम्या
आज अग्निवीरांची पहिली तुकडी नौदलात दाखल होणार
आज अग्निवीरांची पहिली तुकडी नौदलात दाखल होणार आहे.
आज अग्निवीरांची पहिली तुकडी नौदलात दाखल होणार आहे. INS चिल्कावर मोठ्या दिमाखात पासिंग आऊट परेड सोहळ्यात हे प्रशिक्षित अग्निवीर नौदलात रुजू होतील. पहिल्यांदाच सूर्यास्तानंतर परेड होणार आहे.भारतीय सशस्त्र दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच ही परेड सूर्यास्तानंतर आयोजित करण्यात आली आहे. यासाठी नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार पासिंग आऊट परेडचे प्रमुख पाहुणे असणार आहेत.
जून 2022 मध्ये तिन्ही सैन्य दलासाठी अग्निपथ योजनेची घोषणा करण्यात आली होती. यात आयएनएस चिल्का वर पासिंग आऊट परेड पार पडणार आहे. 2600 अग्निवीरांची तुकडी आज नौदलात सामील होणार आहे. यामध्ये 273 महिला अग्निवीरांचाही समावेश आहे.
अग्निवीरांच्या या बॅचमध्ये अनेक तरुणींचाही समावेश आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही लष्कर प्रमुखांनी 14 जून 2022 रोजी अग्निपथ योजनेची घोषणा केली होती.