Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस
वसईत आज पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन झाले आहे. आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त भव्य जुलुस काढला होता. या जुलुश मध्ये अनेक हिंदु बांधवांनी सहभाग दर्शविला होता. अनंत चतुर्दशी मंगळवारी आल्यामुळे मुस्लिम बांधवांनी सोमवरा ऐवजी ईद ए मिलाद आज बुधवारी साजरा केला.
वसईत साजरा करण्यात आलेल्या जुलुसमध्ये मुस्लिम बांधवासोबत हिंदू बांधवही सहभागी झाले होते. काल अनंत चतुर्दशी दिवशी वसई-विरारमध्ये मुस्लिम बांधवांनी बाप्पाच्या विसर्जन मार्गावर पाणी आणि खाद्य वाटप केलं होतं. आज हिंदु बांधवांनी ही ईद ए मिलाद उन नबीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता. या कार्यक्रमास वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थिती लावली होती.
मुस्लिम समाजाने दोन दिवसानंतर आपला सण साजरा केला, हा त्यांचा मोठेपण आहे. धर्माच्या नावाने जातीच्या नावाने जे राजकारण चाललयं ते वाईट वाटत असल्याच सांगत, त्यांनी येथे मागील चाळीस वर्षात कधीच धार्मिक दंगे कधीच झाले नसल्याचे सांगितले. तर आयोजकांनी वसईत सर्व जाती धर्माचे लोक येथे एकात्मतेने आणि गुण्यागोविंदाने राहत, एकमेकांच्या सणात येथे सामील होत असल्याच सांगितलं.