मुंबई लोकल मार्गावर आज मेगाब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक
आज मुंबई लोकल मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव या दरम्यानच्या जलद मार्गावर आणि बोरिवली ते कांदिवली धीम्या मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकच्या कालावधीत डाउन मार्गावरील जलद लोकल या अंधेरी ते बोरिवली दरम्यान धीम्या मार्गावरून चालवण्यात येतील. तर, डाउन मार्गावरील एक्स्प्रेस, मेल गाड्या अंधेरी ते बोरिवली दरम्यान पाचव्या मार्गिकेवरून चालवण्यात येतील. ब्लॉकमुळे काही लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.
पनवेल - कुर्ला ही विशेष लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरून 20 मिनिटाच्या कालावधीत चालवण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी असेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे/ चुनाभट्टी या मार्गादरम्यान सकाळी 11.40 वाजल्यापासून ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर, चुनाभट्टी/ वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.