काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी! भाजपला मोठा दणका
काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी
कोल्हापूर उत्तरच्या अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी मैदान मारलं आहे. भाजप उमेदवार सत्यजीत कदम यांना मोठी धोबीपछाड देत जाधव यांनी या विजयाची नोंद केली आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणुक लागली होती. जयश्री जाधव यांनी कदम यांचा १८ हजारापेक्षा जास्त मतांनी पराभव केला.
मतमोजणीच्या एकूण २६ फेऱ्या पार पडल्या आहेत. यात सुरूवातीपासूनच जयश्री पाटील या आघाडीवर होत्या. शेवटच्या २६ व्या फेरीपर्यंत एकूण १८ हजार ९०१ मतांनी जयश्री जाधव विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले.
तेविसाव्या फेरी अखेर:
जयश्री जाधव- 86675
सत्यजित कदम- 70344
आघाडी: 16301
बाविसाव्या फेरी अखेर:
जयश्री जाधव- 79,809
सत्यजित कदम- 64,667
आघाडी: 15,182
अठराव्या फेरी अखेर:
जयश्री जाधव- 68732
सत्यजित कदम- 54917
आघाडी: 13815
सतराव्या फेरी अखेर:
जयश्री जाधव- 64784
सत्यजित कदम- 51688
आघाडी: 13096
सोळाव्व्या फेरी अखेर:
जयश्री जाधव- 61989
सत्यजित कदम- 48200
आघाडी: 13789
पंधराव्या फेरी अखेर:
जयश्री जाधव- 58351
सत्यजित कदम- 44393
आघाडी: 13998
चौदाव्या फेरी अखेर:
जयश्री जाधव- 54863
सत्यजित कदम- 42297
आघाडी: 12266
तेराव्या फेरी अखेर:
जयश्री जाधव- 50807
सत्यजित कदम- 39628
आघाडी: 11179
बाराव्या फेरी अखेर:
जयश्री जाधव- 46,421
सत्यजित कदम- 37,196
आघाडी: 9225
अकराव्या फेरी अखेर:
जयश्री जाधव- 42,475
सत्यजित कदम- 34,288
दहाव्या फेरी अखेर
जयश्री जाधव- 39605
सत्यजित कदम- 31572
उत्तर कोल्हापूर पोटनिवडणूकीचे LIVE UPDATES:
महाविकास आघाडीची आघाडी पुन्हा घटली; नवव्या फेरीअखेरीस जयश्री जाधवांकडे 8959 मतांचे मताधिक्य
आठव्या फेरीमध्ये सत्यजित कदमांची बाजी; जयश्री पाटलांकडे 9152 मतांची आघाडी
सातव्या फेरीअखेरीस जयश्री पाटलांची आघाडी वाढली; 9676 मतांची आघाडी
सातव्या फेरीच्या मतमोजणीला सुरूवात
सहाव्या फेरीअखेरीस जयश्री जाधव 8,405 मतांनी आघाडीवर
पाचव्या फेरीत सत्यजित कदमांना 500 मते अधिक तरीही, जयश्री जाधव आघाडीवर
निकालाआधीच विजयाचे पोस्टर
निकालाआधीच जयश्री जाधव यांच्या विजयाचे पोस्टरही झळकू लागले आहेत. कसबा बवड्यातील पिंजर गल्ली कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ, बाल शिवाजी तरुण मंडळ शाहू तरुण मंडळ छत्रपती संभाजीराजे उत्सव कमिटी जय शिवराय तरुण मंडळ जयहिंद स्पोर्ट कैलासवासी सुरेश मित्र मंडळ अचानक ग्रुप, गजू ग्रुप यांनी पोस्टर लावले आहे.
उत्तर कोल्हापूर पोटनिवडणूकीचे LIVE UPDATES:
चौथ्या फेरीअंतीही जयश्री जाधव आघाडीवर; जयश्री जाधवांना 19008 तर, सत्यजित कदमांना 11735 मतं
तिसऱ्या फेरीअंती कॉंग्रेसच्या जयश्री जाधव 15,299 मतांसह 7,501 मतांनी आघाडीवर
दुसऱ्या फेरीअंती जयश्री जाधवांना 10371 तर, सत्यजित कदमांना 5232 इतकी मते
दुसऱ्या फेरीतही कॉंग्रेसच आघाडीवर
पहिल्या फेरीअंती कॉंग्रेसच्या जयश्री जाधव 2137 मताधिक्याने पुढे
उत्तर कोल्हापूर विधानसभेच्या पोटनिवडणूकीची (Kolhapur Elections) व त्या निवडणूकीच्या प्रचाराची चर्चा मागचे अनेक दिवस सुरूच आहे. विधानसभेच्या पोटनिवडणूकीची तारीख जाहीर होताच सर्व पक्षीय नेते ह्या निवणुकीच्या प्रचाराला लागलेले पाहायला मिळाले. ही लढत कॉंग्रेस विरूद्ध भाजप अशी पाहायला मिळणार आहे. जयश्री जाधव काँग्रेसच्या तर सत्यजित कदम भाजपचे उमेदवार आहेत. 12 एप्रिल रोजी मतदान पार पडलं असून आज (06-04-2022) ह्या निवडणुकीचा निकाल समोर येणार आहे.
आज मतमोजणी:
ठीक 08:00 वाजता कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. साधारण 12:00-12:30 वाजेपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल व लक्षात येईल की, मतदारांनी आपली मतं कोणाच्या झोळीत टाकून कोणत्या उमोदवाराला व पर्यायाने कोणत्या पक्षावर आपला विश्वास दाखवला आहे. ह्या मतमोजणीच्या एकुण 26 फेऱ्या होतील व त्यानंतर निकाल समोर येईल.
प्रचारासाठी बडे नेते:
दरम्यान, ही निवडणूक जरी एका विधानसभा मतदार संघाची असली तरीही ह्या निवडणूकीवरून कोल्हापूर महापालिका (Kolhapur Municipal Corporation) निवडणुकीचाही कौल मिळू शकतो कारण, या उत्तर कोल्हापूर मतदारसंघामध्ये महापालिकेचे 53 प्रभाग येतात. ह्याच कारणामुळे भाजप व महाविकासआघाडी ह्या दोन्ही बाजूंनी बड्या नेत्यांना मैदानात उतरवलं गेलं. अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रवीण दरेकर,आशिष शेलार, नाना पटोले, केंद्रीय मंत्री रामदास आठवले असे अनेक बडे बडे नेते प्रचारात उतरलेले पाहायला मिळाले.