आज श्रावणातला शेवटचा सोमवार; काय आहे महत्व?
आज श्रावण महिन्याचा चौथा आणि शेवटचा सोमवार आहे. 27 ऑगस्टला श्रावण महिना संपेल आणि भाद्रपद महिना सुरू होईल. श्रावणाच्या चौथ्या आणि शेवटच्या सोमवारी एकादशी आणि रवि योग तयार होत आहेत. या दिवशी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पवित्र एकादशी देखील आहे. श्रावण पवित्र एकादशीला पुत्रदा एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो. दुसरीकडे, रवि योगात शिव-विष्णूची उपासना खूप फायदेशीर मानली जाते.
भोलेनाथाच्या भक्तीसाठी सावन सोमवार हा अतिशय उत्तम मानला जातो. या दिवशी व्रत ठेऊन खऱ्या मनाने रुद्राभिषेक केल्यास सर्व सुख प्राप्त होते असे मानले जाते. आजची शिवमूठ जव आहे. यंदा श्रावण महिन्यात चार श्रावण सोमवार आले आहेत. पहिल्या सोमवारी तांदूळ हे शिवमूठ होते. दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या व शेवटच्या सोमवारी जव ही शिवमूठ आहे. महादेवाची पूजा करीत असताना पूजेच्या वेळी शिवमूठ अर्पण केल्या जातात.