आज 'भारत जोडो यात्रे'चा महाराष्ट्रातील पहिला दिवस

आज 'भारत जोडो यात्रे'चा महाराष्ट्रातील पहिला दिवस

सध्या देशभरात काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' सुरु आहे. राहुल गांधींच्या नेत्तृत्वात ही आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सध्या देशभरात काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' सुरु आहे. राहुल गांधींच्या नेत्तृत्वात ही आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे. काल नांदेडमधील देगलूर या ठिकाणी ही पदयात्रा पोहोचली. यावेळी राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत असलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या हाती मशाली घेतल्या होत्या. त्यांनतर देगलूर नाक्यावर ही मशाल यात्रा आल्यानंतर राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून 14 दिवस ही यात्रा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. अकोला जिल्ह्यातील यात्रा मार्गांवर राहुल गांधी कारने प्रवास करणार आहेत. काँग्रेसच्या या यात्रेत अनेक सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत. कॉंग्रेसची भारत जोडो यात्रा येत्या सात नोव्हेंबरला देगलूरमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर ही यात्रा नांदेड जिल्ह्यातील देगलूर, नायगाव, लोहा, कंधार, भोकर आणि हदगांव तालुक्यातून हिंगोलीत प्रवेश करेल. त्यानंतर कळमनुरी, हिंगोलीमार्गे ही यात्रा वाशिम जिल्ह्यातील रिसोडमध्ये पोहचणार आहे. त्यानंतर अकोल्यातील बाळापूरमार्गे बुलढाण्यातील खामगांवसह जामोद आणि जळगांवमार्गे यात्रा मध्यप्रदेशात प्रवेश करेल.

'भारत जोडो यात्रे'चा महाराष्ट्रातील आज पहिला दिवस आहे. या यात्रेत काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांचा सहभाग आहे. आज भारत जोडो यात्रेला नांदेडमधून सुरुवात झाली आहे. सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण हे या यात्रेत उपस्थित आहेत. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा दुसऱ्या दिवशी देगलूर तालुक्यातील वनाळी येथील गुरुद्वारापासून सुरू झाली आहे. या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणाई दिसत आहे. त्यासोबतच आज राहुल गांधी यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, नसीम खान आदी नेते पायी चालत आहेत.  राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेत मोठ्या प्रमाणावर तरुणाई सहभागी झाली आहे. नांदेडमधील देगलूर येथून महाराष्ट्रातील हा टप्पा सुरू झाला. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com