Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस; प्रकृती खालावली

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस; प्रकृती खालावली

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषण सुरु केलं आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे, आंदोलन काळातील आंदोलकावरील गुन्हे सरसकट मागे घ्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे यांच उपोषण सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला प्रतिउत्तर म्हणून मंगेश ससाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे उपोषण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

यासोबतच लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेसुद्धा उपोषणाला बसले आहेत. आज लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.

बीडसह धाराशिव बंदची देखील हाक देण्यात आली असून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची सरकार दखल घेत नसल्याने सरकारच्या निषेधार्थ बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com