लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस; पंकजा मुंडे यांचे ट्विट म्हणाल्या...

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस; पंकजा मुंडे यांचे ट्विट म्हणाल्या...

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. जालन्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके उपोषण करत आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके उपोषणाला बसले आहेत.

उपोषणादरम्यान लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली असल्याची माहिती मिळत असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी ट्विट केलं आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. पाणी देखील सोडले आहे.

यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पहावे. असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com