Lokshahi Update
Lokshahi UpdateTeam Lokshahi

Live Update : रोडरेज प्रकरणी नवज्योत सिंग सिद्धूला एक वर्षांचा तुरुंगवास

मनसे नेते संदीप देशपांडे आणि संदीप धुरी यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा

रोडरेज प्रकरणी नवज्योत सिंग सिद्धूला एक वर्षांचा तुरुंगवास 

गॅस सिलेंडरचे दर पुन्हा वाढले  

वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 3 रुपये 50 पैशांनी वाढ झालीए. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा दर हजारांच्या पुढे गेलाय. आता, सिलेंडरसाठी नागरिकांना 1 हजार 3 रुपये मोजावे लागणार आहेत. घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर व्यतिरिक्त व्यावसायिक वापराच्या सिलेंडर दरामध्ये देखील वाढ झालीए. व्यावसायिक वापराचा सिलेंडर देखील 8 रुपयांनी महागला आहे.

राज्यातील काही शहरात पेट्रोलचा तुटवडा

वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिक त्रास सहन करताना आता आणखी भाववाढीची मोठी बातमी आहे. राज्यातील काही शहरात पेट्रोलचा तुटवडा असल्याचे समजतय. औरंगाबादमध्ये पेट्रोलची भीषण टंचाई निर्माण झालीय. मात्र या टंचाईमागे पुरवठा हे कारण नसून पेट्रोल आणि डिझेल हे वीस रुपयांनी महाग करण्यासाठी पेट्रोल कंपन्यांकडून 25 % कृत्रिम इंधन टंचाई केली जात असल्याची माहीती मिळतेय. याचा फटका आता देशभरातील नागरिकांना बसणार आ

मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी वाद 

श्रीकृष्ण जन्मभूमीच्या वादाच्या याचिकेवरील सुनावणीचे आदेश मंजूर

मथुरेच्या जिल्हा न्यायालयाने याचिका स्वीकारली

1 जुलैपासून श्रीकृष्ण जन्मभूमीच्या वादावर सुनावणी होणार

जन्मभूमी मंदिराजवळील शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणी

मंदिराचा भाग पाडून मशीद बांधल्याचा दावा

लातूरमध्ये उन्हामुळे बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घटली..आवक घटल्याने भाजीपाला महागला..

सातारा जिल्ह्यात नागरिकांनी फिरवली बुस्टर डोसकडे पाठ.... जिल्ह्यातील 4 लाख 4 हजार 941 नागरिक बूस्टर डोससाठी पात्र..मात्र अद्याप 14 टक्के नागरिकांनीच घेतला बुस्टर डोस..

...तर महाराष्ट्र पेटून उठेल, मनसेची बॅनरबाजी 

मुंबईतील लालबाग येथे मनसेची बॅनरबाजी..राज ठाकरेंना येणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी..राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यालाही होतोय विरोध..

औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी पाच दिवस बंद; पुरातत्व खात्याचा निर्णय 

औरंगाबाद येथील खुल्ताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेली आहे. औरंगजेब कबर कमिटीच्या मागणीनंतर पुरातत्त्व खात्याने हा निर्णय घेतला आहे

मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षण कायम 

मध्य प्रदेशातील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा.. आता महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षण लागू होणार का याकडे लक्ष.. मध्य प्रदेशने ओबीसी आरक्षण मिळवलं... महाराष्ट्राने गमावलं... संबंधितांनी राजीनामा द्यावा... फडणवीसांची मागणी

ज्ञानव्यापी मशिदीवर वाराणसी कोर्टात सुनावणी 

ज्ञानव्यापी मशिदीवर आज वाराणसी कोर्टात सुनावणी.. बंद असलेला पश्चिम दरवाजा उघडण्यासह ... नंदीसमोरील भींत तोडण्याची मागणी..

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com