टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे निधन

टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे निधन

प्रसिद्ध टिकटॉर स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे निधन झाले आहे. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्या ४१ वर्षांच्या होत्या. आज (२३ ऑगस्ट) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या बातमीने लाखो चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

प्रसिद्ध टिकटॉर स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे निधन झाले आहे. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्या ४१ वर्षांच्या होत्या. आज (२३ ऑगस्ट) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या बातमीने लाखो चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली फोगट या काही कामानिमित्त गोव्याला गेल्या होत्या. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर काल रात्री याचे काही व्हिडीओ आणि फोटोदेखील शेअर केले आहेत. पण आज सकाळच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

त्यांनी बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या १४ व्या पर्वात सहभाग घेतला होता. तसेच २०१९ च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.सोनाली फोगट यांचा जन्म २१ सप्टेंबर १९७९ रोजी हरियाणातील फतेहाबाद येथे झाला. त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले होते. सोनाली यांना एक मुलगी असून यशोधरा असे तिचे नाव आहे. सोनाली फोगट यांची प्रसिद्धी पाहून भारतीय जनता पक्षाने हरियाणातील हिस्सार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर भाजपने हरियाणातील महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com