Rain Alert|Rain Update
Rain Alert|Rain Updateteam lokshahi

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता

राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता
Published by :
Shubham Tate
Published on

पुढील 3-4 तासांदरम्यान महाराष्ट्रात काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, परभणी, लातूर, नांदेड जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह, पुढील 3-4 तासांदरम्यान मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Thunderstorm accompanied with lightning,moderate to intense spells of rain)

Rain Alert|Rain Update
Anocovax: पाळीव प्राण्यांसाठी कोरोनाची पहिली लस लॉन्च, जाणून घ्या खासियत

दरम्यान, आयएमडी अलर्टने राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. मात्र, यासोबतच दोन दिवस हवामानात मोठा बदल होणार आहे. राजधानी दिल्लीसह हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील हवामानात बदल दिसून येतील. तापमानात दोन ते तीन टक्क्यांची घसरण नोंदवली जाणार आहे. काही भागात रिमझिम पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. उत्तर भारतात अनेक दिवसांनंतर हलक्या पावसाने वातावरण आल्हाददायक राहील. राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि एनसीआरमध्ये सरी दिसू शकतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com