चंद्रपूरातील 'देव माणूस' गजाआड; डॉक्टर असल्याचे सांगून महिलांना फसवून...
अनिल ठाकरे | चंद्रपूर: बनावट आयडी बनवून फेसबुक आणि मेट्रोमॅनि साईटवर महिलांशी संपर्क साधून फसवणूक व चोरी करणाऱ्या प्रोफेसरला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भंडारा इथून ताब्यात घेतलं आहे. त्याच्या कडून 290 ग्रॅम सोने जप्त करण्यात आलं आहे. सुमित बोरकर असे बनावट नाव धारण करून तो फेसबुकच्या माध्यमातून ओळख निर्माण करून महिलांना लुटत असल्याच्या घटना उघड झाल्या आहेत.
जिल्ह्यातील कोठारी गावातील 67 वर्षीय महिलेच्या घरून 25 तोळे सोनं प्राध्यापक वासनिक यांनी चोरल्याचे उघड झाले आहे. 5 दिवसा पूर्वी पहाटेच्या दरम्यान कोठारी गावात चोरीच्या घटनेने खळबळ उडाली होती.सोहन वासनिक हा चोरी करणारा व्यक्ती हा फिर्यादी महिलेच्या घरी मुक्कामी आला होता. महिला पहाटे फिरायाला गेल्यावर त्याने चोरी करून पोबारा केल्याच उघडकीस आला आहे.
कश्याप्रकारे करायचा फसवणूक?
फेसबुकच्या माध्यमातून ओळख करून मग त्याचे रुपांतर मैत्रीत करुन एकाकी असलेल्या स्त्रीयांना गाठून, लग्न करायचे असल्याचं सांगून विश्वास संपादन करत मैत्री करतो. महिलांना MBBS, MD, स्त्री रोग तज्ञ असल्याचं सांगतो. व त्यांच्या घरी जाऊन काही असचणी सांगून पैसे व दागिन्यांची मागणी करतो. नाही दिल्यास चोरी करतो, त्यांच्या आर्थिक सुबकतेची परीपूर्ण माहिती काढून त्याच्याच घरात मुक्काम ठोकून चोरी करुन पसार होण्याचा त्याचा हातखंडा आहे.