केसांसाठी खूप फायदेशीर आहे 'हे' तेल, जाणून घ्या घरी कसे बनवायचे...
आजकाल केस गळण्याचे प्रमाण वाढत आहे. ही एक सामान्य समस्या बनली आहे. अनेकदा लोक केसांची काळजी घेत नाहीत. आपले केस चांगले दिसण्यासाठी लोक केसांच्या विविध उपचार घेत असतात. परंतु, या उपचारांऐवजी तुम्ही घरगुती उपचार वापरल्यास ते तुमच्यासाठी जलद काम करतील आणि कोणतेही नुकसान होणार नाही.
दालचिनीचे तेल कसे बनवायचे
सर्व प्रथम दालचिनी घेऊन बारीक करा. त्यानंतर त्यात ऑलिव्ह ऑईल मिक्स करून ३-४ मिनिटे गरम करा. गरम केल्यानंतर, थंड होण्यासाठी ठेवा. मग तुम्ही ते आठवड्यातून एकदा वापरावे.
केसांसाठी दालचिनीचे तेल कसे फायदेशीर?
केसगळतीसाठी फायदेशीर
खराब रक्ताभिसरण आणि खराब केसांची निगा राखल्यामुळे केस गळतात. केसांची मुळे कमकुवत झाली की केस गळायला सुरुवात होते. अशावेळी दालचिनीचे तेल केसांसाठी खूप फायदेशीर असते.
केस वाढण्यास मदत करते
जर तुमचे टोक फुटले असतील तर या समस्येवर दालचिनी खूप फायदेशीर आहे. दालचिनी पावडर आणि अंड्याचे मिश्रण करून हेअर मास्क तयार केला जाऊ शकतो. केसांना लावल्याने स्प्लिट एंड्सची समस्या आटोक्यात येते. यामुळे केसांची लांबीही वाढते. केस मजबूत आणि चमकदार राहतात.
केसांचा रंग सुधारण्यासाठी
जर तुम्हाला तुमच्या केसांचा रंग बदलायचा असेल तर तुम्ही दालचिनी वापरू शकता. हेअर कंडिशनरमध्ये 1 चमचे दालचिनी पावडर मिसळा आणि केसांना लावा आणि रात्रभर असेच राहू द्या. सकाळी उठल्यावर केस चांगले धुवा. यामुळे तुमच्या काळ्या किंवा गडद केसांचा रंग बदलू शकतो.
येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. लोकशाही मराठी न्यूज याची पुष्टी करत नाही