काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. याचा भाजप, शिंदे गट आणि मनसेकडून निषेध करण्यात येत असून आंदोलने करत आहेत. यावरुन राहुल गांधी यांनी स्वातंत्र्य वीर सावरकर हा वाद करू नये, टीका करून कुणाच्या भावना दुखवू नयेत अस मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे.
रामदास आठवले म्हणाले की, राहुल गांधी यांच्या यात्रेला प्रतिसाद मिळतोय, पण त्याचे मतात परिवर्तन होणार नाही. ही भारत जोडो नाही भारत तोडो यात्रा आहे, समाजात तेढ निर्माण करणारी ही यात्रा असल्याचे ही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, या यात्रेत गर्दी होतेय कारण लोक त्यांना पाहायला येतायत, या यात्रेचा काही फायदा होणार नाही, गुजरात आणि हिमाचलमध्ये भाजप जिंकणार असा दावा ही आठवले यांनी केला आहे. राज ठाकरे यांच्या बरोबर भाजपच्या युतीला विरोध असल्याचा पुनरोचार आठवले यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्य परिषदेच्या 43 व्या अधिवेशनाचे पिंपरी मध्ये उदघाटन झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.