हा तर हसरा मेळावा; उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावर भाजपाच्या 'या' नेत्याने साधला निशाणा

हा तर हसरा मेळावा; उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावर भाजपाच्या 'या' नेत्याने साधला निशाणा

आज दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. या दसरा मेळाव्यात एकमेकांवर जोरदार आरोप - प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांचे मेळावे सायंकाळीच होणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आज दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. या दसरा मेळाव्यात एकमेकांवर जोरदार आरोप - प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांचे मेळावे सायंकाळीच होणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेचा वार्षिक दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानात होईल. शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे- कुर्ला संकुलात होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा हा खऱ्या अर्थाने विकासाचे सोने लुटणारा मेळावा असेल. तर उद्धव ठाकरे यांचा मेळावा हसरा मेळावा असून यात टीका टोमणे, शिव्याशाप याशिवाय कोणत्याही विचारांचे सोने लुटले जाणार नाही. कारण आता यांचे विचार सोन्याचे होण्याऐवजी सोनियांचे झाले आहेत. हे सोनिया गांधींच्या विचारांची मंडळी झाले आहेत. त्यामुळे आता विचारांचे सोने लुटण्याच्या मनस्थितीत नाहीत हे शिवसैनिक देखील समजून चुकले आहेत, असा जोरदार हल्लाबोल भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केला आहे.

हा तर हसरा मेळावा; उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावर भाजपाच्या 'या' नेत्याने साधला निशाणा
कायद्याच्या चौकटीत राहून भाषण करावं, अन्यथा...फडणवीसांचा इशारा

यासोबतच ते म्हणाले की, येथील आमदार राजन साळवी हे तळ्यात-मळ्यात आहेत. कुठे जावे कोणता झेंडा हाती घेऊ अशी अवस्था आमदार राजन साळवींची झाली आहे .सत्येत पण जायचे आहे आणि आमदारकी पण टिकवायची आहे. धरलं तर चावतंय आणि सोडले तर पळते अशी अवस्था त्यांची झाली आहे. रिफायनरी प्रकल्प धरावा तर चावतय आणि सोडलं तर प्रकल्प पण जातोय आणि आमदारकी पण जाते. असे आमदार प्रमोद जठार म्हणाले.

हा तर हसरा मेळावा; उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावर भाजपाच्या 'या' नेत्याने साधला निशाणा
‘खोके’वाल्यांचा अधर्म या निष्ठेपुढे कसा टिकेल? शिवसेनेचा शिंदे-भाजपाला सवाल
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com