राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले 'हे' 19 महत्वाचे निर्णय
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. बैठकीत टोलमाफीसह तब्बल 19 मोठे निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे. विधानसभा आचारसंहितेआधी राज्य सरकारने मोठे निर्णय घेतलं आहेत.
राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकींच्या तारखांच्या घोषणा होऊ शकतात. आचारसंहिता कधीही लागू शकते. त्याच्याआधी राज्य मंत्रिमंडळात बैठकीतून महत्वाचे निर्णय घेतलं जात आहेत.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
- मुंबई एन्ट्री पॉईंटवरील टोलनाक्यावर हलक्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी
- कौशल्य विद्यापीठास रतन टाटांचं नाव देण्याचा निर्णय
- आगरी समाजासाठी महामंडळाची घोषणा
- समाजकार्य महाविद्यालयांमधील आध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम
- दमणगंगा एकदरे-गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता
- आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता
- वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता
- राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित
- पाचपाखाडीमधील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी मंजूर
- खिडकाळीमधील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी देण्याचा निर्णय
- राज्यात प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 राबवणार
- पुणे मेट्रो रेल टप्पा-2मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता
- किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ
- अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ
- मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनच्या 3 पदांची निर्मिती
- खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना
- मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा (मराठी भाषा)
- उमेदसाठी अभ्यासगट (ग्राम विकास)
- अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगटाची स्थापना