Heavy Rain
Heavy Rain Team lokshahi

राज्यात एक सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

राज्यात आता पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र काही ठिकाणी पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. दरम्यान, येत्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असण्याची शक्यता असून, हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर 1 सप्टेंबपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज्यात आता पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र काही ठिकाणी पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. दरम्यान, येत्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असण्याची शक्यता असून, हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर 1 सप्टेंबपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली होती. आजपासून पुढील दोन दिवस विदर्भात पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, 1 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार असल्यानं शेतकऱ्यांनी योग्य ते नियोजन करावं असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यानं वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तसेच शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे.

Heavy Rain
चिंतामणी गणपतीच्या आगमनासाठी मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत बदल
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com