राज्यभरात जोरदार पावसाची शक्यता

राज्यभरात जोरदार पावसाची शक्यता

राज्यभरात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी पावसाने मुंबईसह राज्याला झोडपले आहे
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज्यभरात परतीच्या पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. शुक्रवारी पावसाने राज्याला चांगलेच झोडपले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल मुंबई शहर, उपनगर आणि आजूबाजूच्या भागात पावसाच्या विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तर आज 8 ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

९ ऑक्टोबर शनिवार आणि १० ऑक्टोबर रविवारी मुंबईत ढगाळ वातावरण राहील तसेच पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी ढग असतील आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मुंबईत किमान तापमान २७ अंश सेल्सियस तर कमाल तापमान ३१ अंश सेल्सियस असण्याची शक्यता आहे. पुढचे काही दिवस पावसाच्या मध्यम किंवा हलक्या सरी बरसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान 10 ऑक्टोबरनंतरच मान्सून निघून जाईल आ

हवामान विभागाने मुंबईला आज यलो अलर्ट जारी केला आहे. 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com