...तर एकनाथ शिंदेंचा आनंद दिघे झाला असता
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. या निवडणुकीनंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नॉट रिचेबल असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे १३ आमदार असल्याचे बोलले जात आहे. सध्या एकनाथ शिंदे या १३ आमदारांसोबत गुजरातमध्ये असल्याचेही म्हटले जात आहे. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील आमदार फुटीवर नारायण राणें (Narayan Rane) यांनी ट्विट केले आहे.
आता भाजपाचे नेते नारायण राणें यांनी ट्विट केले आहे की, शाब्बास एकनाथजी, योग्यवेळी योग्य निर्णय घेतलास, नाहीतर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता.असा टोला त्यांनी शिवसेनेतील आमदार फुटीवर दिला आहे. एकनाथ शिंदेंसोबत १३ आमदारही शिवसेनेच्या संपर्कात नसल्याची माहिती समोर येत आहे. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व शिवसेना आमदारांची ‘मातोश्री’वर बैठक बोलावली आहे. एकनाथ शिंदे या बैठकीत उपस्थित राहणार नाही अशी चर्चा आहे.
एकनाथ शिंदे सुरतमध्ये असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेचे तब्बल 3 आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांची 9 अशी एकूण 12 मतं फुटल्याचं कालच्या विधान परिषद निवडणुकी स्पष्ट झालं आहे. .