देशातील पहिलं अधारकार्ड प्राप्त करणाऱ्या महिलेची दिवाळी अंधारात...
प्रशांत जव्हेरी : नंदुरबार | राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोरगरिबांची दिवाळी आनंदात जावी यासाठी राज्यात आनंदाचा शिधा किट वाटप करण्याचा निर्णय घेतला मात्र दिवाळीत दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये आनंदाचा शिधा पोहचू शकलेला नाही याचेच एक उदाहरण म्हणजे देशातलं पहिलं आधार कार्ड प्राप्त करणारी महिला नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली या गावातील रंजना सोनवणे या महिलेला आनंदाचा शिधा मिळाला नाही या महिलेची आणि गावातील लोकांची दिवाळी गोड झाली नसून दिव्यांना तेल नाही, घरात दिवाळीचा गोडवा नाही ही दिवाळी प्रकाश आणणारी नाही तर अंधार पाडणारी ठरली त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस कडून या महिलेच्या घरात महिना भराचा किराणा देण्यात आला आहे.
देशातलं पहिलं आधार कार्ड प्राप्त करणारी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील टेंभली गावातील महिला रंजना सोनवणे यांना दिवाळी सणात राज्य सरकार मार्फत मिळणारी आनंदाची शिधा देखील प्राप्त झाली नव्हती त्यांची संपूर्ण दिवाळी ही काळ्या अंधारात गेली. असं म्हटलं जातं की दिवाळी सर्वत्र उजेड निर्माण होतो परंतु टेंभली गावातल्या देशातल्या प्रथम आधार कार्ड प्राप्त करणाऱ्या महिला रंजना सोनवणे यांची दिवाळी मात्र काळोखातच गेली यांची व्यथा समजल्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी लागलीच त्यांच्या घरी पोहचून त्यांची संपूर्ण व्यथा जाणून घेतली व आज त्यांना एका महिन्याचा संपूर्ण किराणा देण्यात आला आहे या शिंदे फडणवीस सरकारचं हे अपयश असून त्यांनी राज्यातल्या गोरगरीब जनतेकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी यावेळी सांगितले.